सा. क्रांतिवीर.....तू दुकानासमोर गाडी लावून तर बघ.!
प्लास्टिक बंदीची अशीही सोशल धूम..
नांदगाव --संतोष कांदे
. ‘तू दुकानासमोर गाडी लावूनच बघ, नाही तुझ्या हँडलला प्लॅस्टिक कॅरीबॅग लावली, तर बघ… ’ यासह अनेक मनोरंजक पोस्ट ने आज प्लास्टिक बंदी ची मजा घेतली.महाराष्ट्रात आजपासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीचा विषय सोशल मिडियात चर्चिला गेला.
'आज कोणी ५००० रुपये ज़र दंड मागितला, तर त्याला सांगा सरकार ने दिलेल्या १५ लाखा मधून कापून घे,प्लास्टिक सर्जरी चालेल का?…नाय …सहज शंका म्हणुन विचारल…एक पुणेकर, काय बाई ह्यांच रोजचं नाटक…,आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या, आता गादीखालच्या पिशव्या,
नवीन धमकी तू नुसती गाडी पार्कींगला लाव, नाही तुझ्या हँडल ला कॅरी बॅग लावली तर बघ !,घरापुढे गाडी लावु नये, अन्यथा गाडीला प्लास्टिकची पिशवी अडकवली जाईल..,आमच्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी कव्हर लावून मिळेल. …स्थळ: अर्थातच पुणे
, जिसने जिसने प्लास्टिक सर्जरी की है, वे रास्तेपर ना घुमे.! या पद्धतीच्या पोस्ट आज दिवसभर सोशल मिडियात फिरत होत्या.
Comments
Post a Comment