सा. क्रांतिवीर....नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे शिक्षण प्रबोधन फेरी
सा. क्रांतिवीर
जातेगाव--वार्ताहर
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशासनाने काल (दि.१४) रोजी सायंकाळी सहा वाजता शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने गावातून मशाल फेरी काढून पालक व विद्यार्थ्यांना शाळा उद्यापासून सुरू होत असल्याचे सुचित करून पहिल्या दिवशी उपस्थित ठेवण्याचे आवाहन केले.
या वेळी गिरवु अक्षर - होऊ साक्षर, मुलगा मुलगी एक समान - दोघांना शिकवू छान, साक्षरतेचा दिवा - घरोघरी लावा.! आदी घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत ही मशाल फेरी काढली होती. गावातील ६ वर्ष वय पूर्ण असणाऱ्या प्रवेशपात्र मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.सदर फेरीचा उद्देश गावातील सर्व प्रवेशपात्र बालके १०० % शाळेत दाखल करणे,सर्व विद्यार्थाना१०० % शाळेत उपस्थित ठेवणे हा होता.
सदर मशालफेरीत शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण, शिक्षक निलेश शितोळे, नंदु चव्हाण, दीपक पाटील, संतोष पवार तसेच डांगरे वस्तीशाळेचे मुख्याध्यापक योगेश साळवे, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद पवार, अंगणवाडी कार्यकर्ती सौ. कमलबाई पवार, सौ.आशाबाई बोबडे, श्रीमती सुशिलाबाई चव्हान, सौ काळे आदींनी सहभाग घेतला होता.
Comments
Post a Comment