सा. क्रांतिवीर......जय मल्हार सेनेचे जात प्रमाणपत्र साठी निवेदन.!

नांदगाव---संतोष कांदे

भटक्या विमुक्त जाती जमाती  समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी जुने दस्तावेज उपलब्ध होत नसल्याने त्यांची कुचंबणा होत असल्याचे चित्र असून,यात प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढावा.अशी मागणी युवा मल्हार सेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.
       या बाबत अधिक असे की,भटक्या विमुक्त समाजातील लोक हे भटकंती, मेंढी पालन करत असल्या कारणाने यांच्या पूर्वजांनी व वाड-वडिलांनी शिक्षण घेतल्याचे प्रकार अगदी थोडे आहे.त्यामुळे या समाजातील बहुतांश कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे जुने दस्तावेज मिळून येत नाही,म्हणून त्यांना जातीचे दाखले मिळत नाही.परिणामी त्यांना शासकीय सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे.यात धनगर, लोहार, वंजारी, वडार, गवळी आदी समाजाचा समावेश आहे.प्रांताधिकारी दराडे यांनी यावर मार्ग काढावा असे या निवेदनात म्हटले आहे.
     यावेळी युवा मल्हार सेना चे जिल्हा अध्यक्ष सिताराम पिंगळे, नांदगाव तालुका अध्यक्ष बिरु शिंदे, नांदगाव शहर अध्यक्ष बिरदेव देवकाते,खुशाल सोर, संदिप पाटील, किशोर शिंगाडे,पंकज शिंदे, होनाजी खरात, पुरुषोत्तम जानराव ,शंकर जानराव , विवेकानंद काळे व समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ