नांदगाव विशेष बातमी

नांदगाव ------संतोष कांदे

पत्रकार असल्याचा फायदा घेत शहरातील काही व्यापारी व हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या गोर-गरीब लोकांना 'भिशी'या जुगार प्रकारात पैसे गुंतवण्यास लावले व त्यांचे लाखो हडप केले.आणि त्या लुबाडलेल्या रकमेतून स्वतःच्या टोलेंजंग इमारती उभ्या करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी या बाधितांनी केली आहे.
      नाशिक जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संजय दराडे यांची भेट घेवून वरील प्रकार त्यांच्या कानी घालण्यात येणार असल्याची वदंता आहे.तसेच या प्रकारात असा प्रकार करणारा पत्रकार आहे,म्हणून एका राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी जवळपास २ लाख रुपये गुंतवले होते,मात्र ते ही आता बुडल्यात जमा आहे.आणि स्वतः च्या सख्या भावाला ही ७० हजार रुपयांना गंडवले आहे.एका किराणा दुकानदाराचे ९ लाख रुपये तर त्या दुकानदाराच्या मुलीचे ४ लाख अशा १३ लाख रुपयांना चुना लावला आहे.
     एका चुलत भावाला तर ३ लाख रुपयांना फसवून हात वरती केल्याने तोंडावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.सदर पैसे परत मिळावेत,म्हणून एका दुकानदाराने त्याच्या नावाचा जाहीर फलक ही दुकानाबाहेर लावला होता.
     पैसे परत मिळावेत,म्हणून थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला जाणार असल्याची माहिती या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ