सा. क्रांतिवीर....मुस्लिम तरुणाची रमजान ईद अनोख्या पद्धतीने साजरी.!
नांदगाव-----संतोष कांदे
भावनेने ओतप्रोत,आत्मीयतेचा संदेश देणारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली.तर लतीफ शेख यांनी मात्र पारंपारीक ईद साजरी न करता नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील आदिवासी कुटुंबातील मुलांना कपडे,मिष्टान्न देत महंमद पैगंबर यांना अपेक्षित अशी ईद साजरी करून अवघ्या मुस्लिम बांधवांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
महंमद पैगंबर सर्वांसाठी अभियान नाशिक विभागाचे लतीफ शेख यांनी सर्वप्रथम या आदिवासी कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींची माफी मागितली की,आम्ही आपल्या देशातील या गोर-गरीब बांधवांपर्यत पोहचू शकलो नाही,किंवा तुमची साधी विचारपूस ही केली नाही.या बद्दल दिलगीर आहोत.आज पर्यंत आम्ही तुम्हाला विसरून ईद साजरी करत होतो.प्रत्यक्ष ईश्वर महंमद पैगंबर यांच्या आदेशाचेच आम्ही उल्लंघन केले आहे.त्यामुळे आज तुम्ही माफ केले,तर ईश्वर आम्हाला माफ करेल.! आज आमचे अज्ञान दूर झाले आहे,या पुढची प्रत्येक ईद तुमच्या सोबत म्हणजेच गोर-गरीब बांधवांसोबत साजरी करू.! कारण आपण एकाच माता-पित्याची लेकरं आहोत.असे भावनिक मत मांडत माफी मागितली,व माफी मिळाल्यानंतर त्यांच्या सोबत ईद साजरी केली.
यावेळी लतीफ शेख सा. क्रांतिवीर शी बोलताना म्हणाले की, मुहम्मद पैगंबर स.स. म्हणतात....
तो मोमीन नव्हे ज्याने स्वत: पोट भरुन खावे व त्याचा शेजारी उपाशी रहावे.
ज़र महाराष्ट्रात आदीवासी/दलित/शेतकरी बांधव उपासमारीला कंटाळून जीवन संपवत असतील तर महाराष्ट्राच्या मुस्लिम बांधवांवर त्यांना मदत न केल्याचा आरोप होतो,आणि मुहम्मद पैगंबरांच्या आदेशांचे उल्लंघन झाले असे मानले जाते,आणि मुस्लिम बांधव सक्षम असताना ही जाणीवपूर्वक मदत करत नसतील तर ते मोमीन होऊ शकत नाही.असे ते शेवटी म्हणाले.
Comments
Post a Comment