सा. क्रांतिवीर....परीणाम बातमीचा...जळगाव बुद्रुक पाणीपुरवठा सुरू.!
नांदगाव ----संतोष कांदे
काल ऑनलाइन सा. क्रांतिवीर मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'जळगाव बुद्रुक च्या कृत्रिम पाणी टंचाई च्या बातमी ची दखल घेऊन,रात्रीपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बाबत अधिक असे की,जळगाव बुद्रुक गावाला कासारी (ता.नांदगाव) येथील चांदेश्वरी बंधाऱ्याखालील उदभवातून पाणी पुरवठा केला जातो.मात्र बंधाऱ्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने या उदभवातील पाणी साठा कमी-कमी होत चालला आहे.मात्र तीन दिवसांच्या फरकाने यात बऱ्यापैकी पाणी साठते.येथून पाणी पुरवठा सुरू करताच कासारी शिवारात काही ठिकाणी नैसर्गिकरित्या तर काही ठिकाणी अज्ञात ही पाईप लाईन फोडून पाणी चोरतात.परिणामी गावाला पाणी पुरवठा होऊ शकत नाही.
आणि जळगाव बुद्रुक येथील काही शेतकरी आपल्या विंधन विहिरीचे पाणी देण्यास तयार आहेत,मात्र गटातटाच्या राजकारणामुळे ह्या प्रक्रियेला खीळ बसून ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाई चा सामना करावा लागतो.
पाणी टंचाई चे वृत्त प्रसिद्ध होताच,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी ग्रामसेविका श्रीमती राठोड यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.त्यानुसार आज सकाळी गावात मुबलक पाणी आल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment