सा. क्रांतिवीर....पोलीस पाटील झाला...पोलीस उपनिरीक्षक.!

नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील दुर्मिळ उदाहरण..

नांदगाव --संतोष कांदे

मनात जिद्द असेल,तर आकाशाला गवसणी घालता येते असे म्हणतात.या उक्तीला चपखल बसेल असे यश नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील पोलीस पाटलाने प्राप्त केले आहे.गावची पाटीलकी सांभाळत त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
      सामान्य शेतकरी कुटुंबातील नानासाहेब सरोवर यांच्या किशोर नामक तरुणाने हे यश मिळवले आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी पोलीस पाटील पदासाठी परीक्षा देवून पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली.आणि यावरच न थांबता गावाची पाटीलकी सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची

परीक्षा दिली.यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला,आणि त्याची पोलीस उपनिरीक्षक पदावर वर्णी लागली आहे.त्याचे घाटमाथ्यावर अभिनंदन केले जात आहे.


Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ