सा.दामिनी
नांदगाव-----संतोष कांदे
योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ न शकल्याने अनेक महत्त्वाच्या पदांपासून वंचित राहण्याचा प्रसंग माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्या वाटेला आला,तर अतिरीक्त धाडस वापरल्याने माजी आमदार संजय पवार यांना महत्वाच्या पदांपासून वंचित राहावे लागले.यांसह अनेक घडामोडी घडत असलेल्या नांदगाव तालुक्यात भावी आमदार पदासाठी आज पासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.
न्यायडोंगरीचे सरपंच ते लाल दिव्यांची गाडी असा राजकीय प्रवास केलेल्या माजी आमदार अड.अनिल आहेर यांची राजकीय एक्स्प्रेस जिल्हा परिषद सदस्य पदांपासून सुसाट सुटली होती,जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार पद घेतल्यानंतर त्यांनी मंत्री पदापर्यंत धडक मारली होती,मात्र काही कारणास्तव मंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली.
नांदगाव तालुक्याचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे,मात्र एका कंपूला सांभाळण्याच्या नादात दुसरी टर्म नाकावरच्या चष्म्याने घालवली.असे त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात.सामान्य कार्यकर्ते सांभाळताना त्यांची झालेली दमछाक अवघ्या तालुक्याने बघितली आहे,त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे,त्या तुलनेत माजी आमदार संजय पवार असो वा शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या ठायी तो संयम दिसून येत नाही.
चूक झाली प्रसार माध्यमांसमोर कबूल करण्याचे धाडस अड.अनिल आहेर दाखवू शकतात,मात्र भावी आमदार पदाचे स्वप्न पाहणारे हे धाडस का करू शकत नाही.? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
Comments
Post a Comment