नांदगाव तालुका राजकीय वृत्त

राजकीय योगायोगाचा नांदगाव तालुका

नांदगाव -------संतोष कांदे

तुरुंगात असलेल्या व्यक्तीला थेट आमदार पदाचा बहुमान देणारा नांदगाव तालुका राज्यातील पहिलाच मतदारसंघ त्या काळातील असावा.!
        स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री देण्याचा मान थोडक्यात हुकला,मात्र तरीही सत्ताकारणातील दुसऱ्या क्रमांकाचे समजले जाणारे पहिले महसुलमंत्रीपद नांदगाव तालुक्याला मिळाले होते.महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावलेल्या दिवंगत भाऊसाहेब हिरे या आदर्श नेत्याचा हा मतदारसंघ ही अभिमानास्पद बाब आहे.
          कै.हिरे यांनी जिल्हा बँकेच्या निर्मितीसह १९५६ मध्ये कुळ कायदा लागू केला.१९६७ पर्यंत हिरेंचा वारसा त्यांचे पुत्र कै.व्यंकटराव हिरे यांनी सांभाळला.आणि कै.व्यंकटरावांचा त्यांचेच चुलत बंधू कै.शिवराम हिरे यांनी तुरुंगात असतानाही पराभव केला होता.त्यानंतर मनमाड चे कै.हिरुभाऊ गवळी यांना १९७२ ते ७८ पर्यंत काम करण्याची संधी मिळाली.७८ मध्ये घाटमाथ्यावरील बोलठाण येथील मारवाडी समाजाच्या कै.कन्हूशेठ नहार यांनी सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग केला.सर्व जाती-धर्माची मोट बांधत चक्क आमदारकी खेचून आणली.स्वतःच्या समाजाची बोटावर मोजता येतील इतकीच मते असलेल्या कै.नहार यांचा प्रयोग यशस्वी ठरला खरा.! पण त्यांना अवघी दोन वर्षांची कारकीर्द उपभोगता आली.
        कारण याच काळात काँग्रेस शी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांनी 'पुलोद'चा प्रयोग केला आणि त्यांचा हा प्रयोग फक्त येवल्याचे आमदार कै.जनार्दन बोडखे पाटील (जनुभाऊ) व नांदगाव चे आमदार कन्हूशेठ नहार (कन्हूभाऊ) यांच्या भरवश्यावर होता.याची जाणीव ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ नांदगाव तालुक्यात आठवडा दर आठवडा पायधूळ झाडत होते.
        या दोन आमदारांची आठवण खासदार पवार आजही काढतात.ही नक्कीच त्यांच्या कामाची पावती होय.१९८० मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने मनमाड शहरातील अड.जगन्नाथ धात्रक यांना उमेदवारी दिली.व ते आमदार ही झाले.१९८५ मध्ये काँग्रेस च्या अड.धात्रक यांचा पराभव करत माकप चे कॉ. माधवराव गायकवाड आमदार झाले.आजपर्यंत सुरु असलेली ५६ खेडी पाणी पुरवठा योजना त्यांचीच देण.!
     तर १९८५ मध्ये २२ हजार मते मिळूनही पराभूत झालेले अड.धात्रक १९९० मध्ये काँग्रेस च्या तिकिटावर अवघी २० हजार मते मिळवून आमदार झाले.याच निवडणुकीपासून शिवसेना या नव्या विरोधकाची भर पडली.तेव्हा पहिल्याच निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते म्हणजेच सुमारे १६ हजार ३६० मते मिळाली होती.या मतांमध्ये नंतरच्या काळात वाढ होत १९९५ मध्ये या शिवसेना पक्षाचे तालुक्यातील पहिले आमदार झाले राजेंद्र देशमुख.!
       राज्यातही सेना-भाजप ची सत्ता स्थापन झाली,तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या माणिकपुंज धरणाची निर्मिती ही राजेंद्र देशमुख यांचीच.१९९८ मध्ये नाशिक जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या अड.अनिल आहेर यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती.१९९९ मध्ये या कामाचा फायदा त्यांना नांदगाव विधानसभेची उमेदवारी व आमदारकी मिळण्यात झाला.यातील चौथा योगायोग असा की,९९ मध्ये ३५ हजार मतांमध्ये आमदार झालेले अड.अनिल आहेर २००४ मध्ये ४२ हजार मते मिळवूनही पराभूत झाले होते.एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांची आजही ओळख आहे.
      अड.आहेरांना पराभूत करणारे शिवसेनेचे संजय पवार अवघी चौथी पास असल्याचे सांगितले जाते,किंवा तेच तसा उल्लेख करत असतात.१९६२ पासून ते २००४ पर्यंत म्हणजेच ४२ वर्षे दर पाच वर्षां आडच्या निवडणुकांची पुनरावृत्ती होत राहिली आहे.२००९ मध्ये काँग्रेस च्या उमेदवारी वरून जोरदार रस्सीखेच झाल्याने तिकिटाचा वाद दिल्ली दरबारी पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस चे हेविवेट नेते आमदार छगन भुजबळ यांनी काँग्रेसला सिन्नर देत नांदगाव राष्ट्रवादी च्या पदरात पाडून घेतले.आणि अवघ्या २१ दिवसात पंकज भुजबळ तालुक्याचे आमदार झाले.आणि पहिली पाच वर्षात भव्य-दिव्य विकासकामे करणाऱ्या आमदार भुजबळ यांच्याकडून दुसऱ्या टर्म मध्ये मात्र पुरता भ्रमनिवास झाला आहे.
     २००४ मध्ये नांदगाव तालुक्यात आलेल्या सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश करताक्षणीच तालुक्यात खिळखिळी झालेल्या किंवा भुजबळ यांच्या प्रभावाने क्षीण झालेल्या शिवसेनेला आज प्रथम स्थानावर आणण्याचे श्रेय कांदे यांनाच जाते,तालुकाभरातील आमदारकी वगळता सर्वच सत्ता बापूसाहेब कवडे यांच्या मदतीने सुहास कांदे यांनी शिवसेनेच्या ताब्यात आणल्या आहेत.त्यामुळेच त्यांना जिल्हाप्रमुख पद बहाल करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ