सा. क्रांतिवीर...नांदगाव महाविद्यालयात योगदिन साजरा.!

नांदगाव---संतोष कांदे

तन मन तंदुरूस्त ठेवायचे असेल, तर  प्रत्येकाने नियमित योगा करणे आवश्यक आहे. योगामुळे आपले शरीर व मन अधिक चांगले बनते व धावपळीच्या काळात शांतता व मानसिक स्वास्थ्य साधण्यासाठी योगाची अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी नांदगाव महाविद्यालयात जागतिक योगादिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या योगासन कार्यक्रमात केले
       यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल, उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवरे व नांदगाव पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस  कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग जागतिक योग दिना निमित्त उपस्थित होते.        कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मैदानावर योगासने करण्यात आली यावेळी योगप्रार्थनेने सुरूवात करून  ताडासन,वृक्षासन,पादहस्तासन,उष्ट्रासन,  त्रिकोणासन,पवनमुक्तासन,नौकासन,शलभासन,शशंकासन,मकरासन,शवासन, सेतुबांधसन,भद्रासन,वक्रासन,भुजंगासन इत्यादी आसने  व कपालभाती,अनुलोम-मिलोन,भ्रामरी,सिंहासन, हास्यासन, आदि प्राणायम करण्यात आली. या आसनाची माहीती व संयोजन शारीरीक शिक्षण संचालक प्रा.दिनेश उकिर्डे व प्रा.आर.टी.आहेर यांनी प्रात्यक्षिकासह दिली.
       या कार्यक्रमासाठी दिलीप अहिरराव, दळे , थोरात,शुभम आहेर,बाबासाहेब निकम, एम.व्ही.दिवटे, सुरेश पवार,अनिल हातेकर,यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ