सा. क्रांतिवीर...नाशिक जिल्हा परिषद कात टाकतेय.! मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांना जाते याचे श्रेय.

नांदगाव -----संतोष कांदे

ठेकेदारांचे वस्तीस्थान, आणि तालुक्यात समस्या सुटत नाही म्हणून जिल्ह्याच्या गावी (जिल्हा परिषद) जाऊनही हात हलवत परत येणारे ग्रामस्थ ; असे चित्र असणाऱ्या जिल्हा परिषदचे रूप पालटलेच,मात्र अवघ्या जिल्ह्यातील प्रशासनाला ही शिस्त लागली आहे,आणि ही किमया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी अल्पावधीत करून दाखवली आहे.

     मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर डॉ.गिते यांनी अवघा जिल्हा पिंजून काढला.या भेटी दरम्यान जे काही कामचुकार अधिकारी,कर्मचारी आढळून आले,त्यांना घरचा रस्ता ही दाखवला.त्यामुळे डॉ.गिते यांना कशाप्रकारचे काम अपेक्षित आहे,याची पुरती जाणीव तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना झाली आहे.ग्रामस्थांची कामे आता वेळेत होऊ लागली आहे.नांदगाव तालुक्यात दर दोन ते तीन दिवसानंतर एक उपोषण,निवेदन,आंदोलन ठरलेले असायचे,मात्र आता सर्व कामे वेळेत होऊ लागल्याने सध्या तरी समाधानी वातावरण दिसून येत आहे.

        डॉ.गिते यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जी मोहीम उघडली आहे,त्यामुळे झाडून सर्व कामाला लागले आहे.या कुपोषण मुक्तीसाठी त्यांनी  एकात्मिक बाल विकास विभागासह ग्रामपंचायत,आरोग्य विभाग यांनाही कामाला लावले आहे,त्याचे दृश्य परिणाम लवकरच दिसून येतील यात काही शंका नाही.

    डॉ.गिते यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त असताना शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष पुरविले होते.विद्यार्थी,संस्था,व नागरिकांच्या मदतीने त्यांनी या शहरात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार शहर स्वच्छतेत मोठी आघाडी उघडून स्वच्छतेच्या कामात स्वतःला झोकून दिले होते,त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर ही हे काम थांबले नाही,म्हणूनच स्वच्छतेत १२९ व्या क्रमांकावर असलेली मीरा-भाईंदर पालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा-२०१८ मध्ये देशातल्या ४२०३ शहरांमधून थेट ४७ व्या स्थानावर आली.तर राज्यात ७ व्या.स्थानावर आली आहे.राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी संपूर्ण राज्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार स्वीकारला आहे.

     
   

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ