सा.क्रांतिवीर....विहिरीचे खोदकाम करताना लावलेल्या सुरुंगाच्या स्फोटाचा दगड लागून एका महिलेचा मृत्यू.!
नांदगाव---संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील कासारी शिवारात एका शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरू असताना लावलेल्या सुरुंगाचा दगड उडून शेजारच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेला लागला,त्यात ती महिला गंभीर जखमी झाली,तिच्यावर मालेगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.
या ह्रदयद्रावक घटनेची थोडक्यात माहिती अशी की,नांदगाव तालुक्यातील कासारी येथील तेजराज काळे या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे,परवा (दि.२५) रोजी तेथे सुरुंग लावण्यात आले होते.त्याचवेळी याची कल्पना नसलेल्या सौ.अलका विजय सानप (वय-४५) ह्या शेतात काम करत होत्या,त्या सुरुंग स्फोटानंतर वेगाने आलेला दगड त्यांना लागला.त्यात त्या गंभीर जखमी झाल्या, त्यांना तत्काळ मालेगाव येथे हलवण्यात आले,मात्र आज त्यांचा उपचार सुरू असताना दुर्दवी मृत्यू झाला.
नांदगाव पोलिसांनी सुरुंग स्फोट केलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे.
Comments
Post a Comment