सा. क्रांतिवीर....रेल्वे प्रवाशांसाठी सतत झगडणारा अवलिया...! सुमित सोनावणे

युवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्याची सामाजिक हिताची धडपड वाखाणण्याजोगी.!

नांदगाव-----संतोष कांदे

घरात सुखवस्तू जीवन..मागेल तेव्हा आणि पाहिजे ती वस्तू सहज मिळते,आणि उच्च शिक्षण ही सुरू आहे,मात्र समाजसेवेची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने स्वतःसह मित्रांना ही समाजकार्यात ओढून आता पर्यंत असंख्य छोटे-मोठे प्रश्न मार्गी लावलेल्या सुमित सोनावणे या तरुणाची कथाच मोठी वेगळी आहे.! आणि या तरुणाचा आदर्श देशातील प्रत्येक तरुणाने घेण्याची गरज आहे.
     वडील रेल्वे पोलीस दलात अधिकारी आहेत,त्यामुळे घरात कशाचीही ददात नाही,शिक्षणात ही प्रगती चांगली आहे.मात्र कॉलेज जीवनात मित्रांना मदत करता-करता समाजकार्य करण्याचा छंद जडला.त्या वेडातून युवा फाउंडेशन नावाची संस्था ही स्थापन केली आहे,या संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो,मात्र वर्गणी म्हणून जमा झालेल्या रकमेतून गोर-गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत,यासारख्या अनेक भन्नाट कल्पना अंमलात आणल्या जातात.महिला शक्तीचा यथोचित गौरव हे एक आणखी वैशिष्ट्य आहे या संस्थेचे.!
     नांदगाव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ता,पाणी,वीज,खड्डे,आरोग्य अशा अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये जो कुणी विभाग कमी पडेल त्या विभागविरोधात युवा फाउंडेशनचे आंदोलन ठरलेले असते.आणि ती समस्या मार्गी लागेपर्यंत माघार घेतली जात नाही.पत्रकारांना हमखास बातमी चे साधन सुमित सोनावणे बनला आहे.
     नवनवीन समाजहिताच्या कल्पना घेऊन तो आंदोलन करत असतो,त्याचबरोबर काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचे धारिष्ट्य ही त्याच्यात आहे.आणि त्याचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे रेल्वे प्रवासी.!
     रेल्वे कडून होणाऱ्या अनेक चुकांवर त्याचे आंदोलन सतत सुरू असते.रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळत असतो.आणि युवा फाउंडेशन च्या माध्यमातून हे आंदोलन करत असताना सामान्य जनता,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांची ही मदत घेऊन त्याचे कार्य सुरू असते.श्रेय-अपश्रेय घेण्याच्या भानगडीत तो कधीच पडत नाही.त्याच्या ह्या कार्याचा आदर्श सर्वांनीच घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ