सा. क्रांतिवीर....अखेर ७० वर्षानंतर तांबेवाडीत पोहचली एस्टी.!
युवा मल्हार सेनेच्या प्रयत्नांना यश...
नांदगाव---संतोष कांदे
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'खेड्याकडे चला असा संदेश दिला होता,मात्र तो संदेश त्यांच्या नावाने सत्ता उपभोगलेल्यानीं मनावर घेतलाच नाही,म्हणून गावात प्रथमच बस आली तर ग्रामस्थांचा उत्साह अवर्णनीय असतो.नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी या गावात आज ७० वर्षानंतर युवा मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर बस सेवा उपलब्ध झाली आहे.
इयत्ता ४ थी नंतर शाळा शिकण्याची इच्छा असतांनाही बाहेर गावी जाण्याची प्रवास सुविधा नाही,म्हणून आता पर्यंत अनेकांनी शिक्षणाला तिलांजली दिली आहे.मात्र सोशल मीडियाच्या जगात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली गोष्ट लपली जात नाही,म्हणून ही बाब युवा मल्हार सेनेच्या निदर्शनास आली.त्यांनी बस आगार प्रमुख विनोद इप्पर यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला,आणि या विधायक कामात त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम पिंगळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
तालुक्याचे अध्यक्ष बिरु शिंदे,शिवसेना शहरप्रमुख सुनिल जाधव बिरदेव देवकाते,खुशाल सोर,संदीप पाटील पंकज शिंदे,तशेच होनाजी खरात हिंमत शिंदे यांनी या गावात बस आणायचीच यासाठी झपाटल्यागत प्रयत्न केले.आणि त्याचेच फलित आज रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता बस तांबेवाडी गावात पोहचली तेव्हा गावकर्यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात बसचे स्वागत केले.
Comments
Post a Comment