सा.क्रांतिवीर.... ग्रामीण भागातील तरुणांना तालुकास्तरीय नेतृत्व करण्याची नांदगाव बाजार समितीत संधी.!
नांदगाव----संतोष कांदे
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील प्रौढ असो वा तरुणांना ग्रामपंचायत,सोसायटी मध्ये काम करण्याची संधी मिळते,मात्र तालुकास्तरीय नेतृत्व करण्याची संधी अभावानेच मिळते,आणि आजच्या काळात हे चित्र अधिकच बिकट झाले असताना ही नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र याला अपवाद ठरली आहे.
नांदगांव तालुक्यातील ७० ते ८० गावांचे कार्यक्षेत्र,तसेच बाहेरील तालुक्यातूनही येणारा शेतमाल यामुळे महिन्याकाठी करोडो रुपयांची उलाढाल होत असते.आणि अशा महत्वाच्या संस्थेवर कामकाज करण्याची मनिषा अनेकांची असते.मात्र काही कारणास्तव या इच्छेला मुरड घालावी लागते.मात्र काही वर्षांपासून या संस्थेत ग्रामीण भागातील प्रौढांना व तरुणांना तालुकास्तरीय नेतृत्व करण्याची संधी मिळत असल्याने 'तालुक्याचे राजकारण आपली बस की बात नही.!' या उक्तीला फाटा मिळाला आहे.
काल उपसभापती पदासाठी निवडणूक होती,मात्र शिवसेनेचे सर्वेसर्वा जिल्हा प्रमुख सुहास कांदे व सहकारतज्ञ जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या एकमताने या पदावर जळगाव खुर्द येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील गोरख सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.व सामान्य कुटुंबातील तरुणांना तालुकास्तरीय नेतृत्व करण्याची संधी देण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची जी पंरपरा सुरू आहे,ती अबाधित राहिली.!
यापूर्वीचे भाऊसाहेब सदगीर,असो वा पुंजाराम जाधव यांनाही या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे.गोरख सरोदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.पी. कांदळकर यांनी जाहिर केेले.
नामनिर्देशन पत्रावर संचालक एकनाथ सदगीर,राजेंद्र देशमुख यांनी स्वाक्षरी केली.यावेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे , मावळते उपसभापती पुंजाराम जाधव , संचालक विलास आहेर , भरत शेलार , दत्तात्रय निकम, दिलीप पगार , हनुमान सानप , भाऊसाहेब हिरे , रामचंद्र चव्हाण ,श्रावण काळे , भास्कर कासार , प्रफ्फुल पारख , भाऊसाहेब सदगीर ,यज्ञेश कलंत्री , यशोदाबाई हेंबाडे , अलकाताई कवडे , सरला दिवटे , मनिषाताई काटकर मंगला काकळीज , सचिव अमोल खैरनार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे ,मजूर फेडरेशन चे संचालक प्रमोद भाबड ,राजाभाऊ जगताप , साहेबराव सरोदे , दत्तात्रय सरोदे, विकास टिळेकर ,सुभाष सरोदे, सुर्यभान सरोदे, ज्ञानेश्वर सरोदे, बाळासाहेब सरोदे, समाधान सुर्यवंशी ,नंदू गोंडळकर ,अनिल सोनवणे , रवि गोंडळकर ,सुनिल सरोदे, भागीनाथ सरोदे ,बापूराव सरोदे , प्रमोद सरोदे, वाल्मिक हेंबाडे , भिमराज काटकर , आदिंसह शेतकरी बांधव , कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरख सरोदे यांच्या निवडीचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत -फोटो
फोटो ओळी - नांदगाव बाजार समिती चे नवनिर्वाचित उपसभापती गोरख सरोदे यांचा सत्कार करताना शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे , जेष्ट नेते बापूसाहेब कवडे (फोटो-बाबासाहेब साठे)
Comments
Post a Comment