सा. क्रांतिवीर...सावित्रीचे प्राण परत आणण्यात सत्यवान अपयशी.!....नांदगाव तालुक्यातील कासारी येथील ह्रदयद्रावक घटना

नांदगाव---संतोष कांदे

आज वटसावित्री पौर्णिमा.! आजच्याच दिवशी सावित्री ने यमाच्या ताब्यातून सत्यवानाचे प्राण परत आणल्याचे पुराण युगात घडल्याचे पोथी सांगते.मात्र नांदगाव तालुक्यातील कासारी येथे सावित्रीचे प्राण वाचवण्यास सत्यवानाला अपयश आल्याची दुर्दवी घटना घडली.
     या बाबत अधिक असे की,'जन्मोजन्मी हाच पती मिळू दे.! अशी प्रार्थना करत भारतीय महिला आजच्या दिवशी वटवृक्षाला फेरी मारतात,हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असला तरी,कासारी गावात याउलट प्रसंग घडला.येथील विजय सानप यांच्या पत्नी अलका बाई ह्या त्यांच्या शेतात (दि.२५) काम करत होत्या.मात्र त्याचवेळी शेजारच्या शेतातील तेजराज काळे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते.त्यावेळी सुरुंग लावले असता,एक वेगाने आलेला दगड सौ.अलका सानप यांना लागला,आणि त्या गंभीर जखमी झाल्या, त्यांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
     अथक प्रयत्न करूनही आज तिसऱ्या दिवशी सकाळी त्यांची प्राणज्योत विझली.पोलिसांनी ज्या ट्रॅक्टर मधून सुरुंग लावले होते,तो ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याची, अजून गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ