सा. क्रांतिवीर....जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांची विकासकामांत भरारी.!

नांदगाव----संतोष कांदे

गावाच्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता नाही,हे माहीत असतानाही केवळ गावातील जनता आपली आहे,या भावनेने गावासाठी सतत काही-ना काही विकासकामे करणाऱ्या जिल्हा परिषद अश्विनी आहेर यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 'मुख्यमंत्री पेयजल योजनेत न्यायडोंगरीचा समावेश करण्यात यश मिळवले आहे.
       काँग्रेसचे माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्या प्रमाणेच अत्यंत कमी कालावधीत अभ्यासू लोकप्रतिनिधी असा नावलौकिक मिळवलेल्या जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी वडिलांच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून न्यायडोंगरी गावाचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत होणेस विनंती केली होती, त्यानुसार सदर मंत्रालयाकडून जिल्हा परिषदेस हा आदेश प्राप्त झाला आहे.
       जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०१८-१९ च्या आराखड्यात न्यायडोंगरी या गावाचा समावेश करण्यात आला आहे,यामुळे
भविष्यात न्यायडोंगरीला नविन पाणी पुरवठा योजना प्राप्त होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
           प्रतिक्रिया-: अश्विनी आहेर,जिल्हा परिषद सदस्या
      न्यायडोंगरी हे परिसरातील मोठे गाव असून येथे रेल्वे स्टेशन, शैक्षणिक व इतर संस्था असून कामानिमीत्त लोकांची नेहमीच गर्दी असते तरी भविष्यात न्यायडोंगरी गावाचा पानिप्रश्न निकाली निघेल.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ