नांदगाव--संतोष कांदे

नांदगाव---संतोष कांदे

महाविद्यालयात आँलिंम्पिक फन रनचे आयोजन

आधुनिक आँलिंम्पिकचे जनक बँरन पिअर दि कुबर्टिन यांच्या अथक प्रयत्नातुन २३जुन १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय आँलिंम्पिक कमिटीची स्थापना करण्यात आली तेव्हा पासुन २३जुन हा दिवस जागतिक पातळीवर हा दिवस आँलिंम्पिक दिन म्हणुन साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी पालक तसेच समाजातमध्ये खेळाविषयी जाग्रुती करण्यासाठी तसेच समाजाचा द्रुष्टीकोन बदलण्यासाठी महाविद्यालयात १कि.मी.ची फन रन आयोजित केली होती.यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे यांनी मुलांच्या तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा.आर.टी.देवरे यांनी मुलींच्या फन रनला फ्लँश आँफ करून उदघाटन केले. यावेळी महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा.दिनेश उकिर्डे यांनी इ.स.पूर्व ते आज पर्यन्तचा आँलिंम्पिकचा इतिहास सांगीतला व मुलांनी जास्तीत जास्त खेळाच्या क्षेत्रातही करियर करावे असे मार्गदर्शन करतांना म्हणाले.या प्रसंगी प्रा. पी.जे.तांबडे, डी.डी.दुधमल, एस.पी.दौड, एस.एस.शेंडगे, एस.एस.वळवी, पी.के.कुलकर्णी, एन.बी.वाकचौरे, एस.एम.नारायणे, आर.एल.दिवटे, व्ही.पी.गढरी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  दिलीप अहिरराव, विलास आहेर, शुभम आहेर, निलेश सोनवणे, दिपक गोरडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ