सा.क्रांतिवीर....नांदगाव माहेश्वरी समाजाच्या अध्यक्षपदी सेना युवा नेते अमोल नावंदर .!
नांदगाव-----संतोष कांदे
माहेश्वरी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन,जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करू.!असे प्रतिपादन नांदगाव माहेश्वरी समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष अमोल नावंदर यांनी केले,ते महेश नवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली,त्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी अध्यक्ष अंकित फोफलिया यांनी नियमाप्रमाणे राजीनामा दिला.व समाजाच्या चालरीतीप्रमाणे नूतन अध्यक्ष अमोल प्रकाश नावंदर यांना राजस्थानी पगडी बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.तर उपाध्यक्षपदी अमित चांडक व सचिवपदी योगेश फोफलिया यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित ३०० पेक्षा अधिक समाजबांधवांसमोर श्री.नावंदर बोलत होते,ते पुढे म्हणाले की,समाजाच्या कामासाठी पूर्णवेळ देऊ,व सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करू.! यावेळी महेश भगवान यांचे पूजन करून आरती करण्यात आली.व ओम नमो शिवाय चा गजर करत मिरवणूक ही काढण्यात आली.
यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.शिबिरात समाजातील २४ महिला आणि पुरुषांनी रक्तदान केले. डॉक्टर अतुल नावंदर यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. तर माहेश्वरी महिला मंडळ यांनी विविध ठिकाणी सरबताचे वाटप करण्यात आले.गुणवंतांचा सत्कार या वेळी माहेश्वरी महिला मंडळ कडून करण्यात आला .भोजनाचा आणि प्रसादाचा कार्यक्रम माहेश्वरी युवक मंडळच्या वतीने ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी माहेश्वरी प्रगती मंडल, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी नवयुवती मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ या वेळी परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment