सा. क्रांतिवीर....पाण्यासाठी राष्ट्रवादी चा लढा.!
नांदगाव---संतोष कांदे
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपकडून हेतुपुरस्कर नांदगाव तालुक्यावर अन्याय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी केला.शहरी व ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्यामधील विस्कळीतपणा दूर करावा,यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज रास्ता रोको आंदोलन छेडले होते.नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी,विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे यांच्या आश्वासनानुसार या रास्ता रोकोची सांगता करण्यात आली.
५६ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना १५ दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याच्या कारणास्तव संतप्त लोकभावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने व्हि.टी. संकुल समोर हे रास्ता रोको आंदोलन छेडले होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी वरीलप्रमाणे आरोप केले.मात्र या आंदोलनाला भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी उपस्थित राहून पाठींबा दिल्याने सामान्य जनतेचा ही गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात 'शहराला कृत्रिम पाणी टंचाईची ही झळ सोसावी लागत असून,पाणी पुरवठा वाटपचे योग्य नियोजन करून सर्वाना समान वाटपाने पाणी मिळावे,शहरातील विंधन विहिरींना आजमितीस भरपूर पाणी आहे,त्यावर जलपरी बसवून,त्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नागरिकांना देण्यात यावे. रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,पोलीस निरीक्षक बशीर शेख,उपनिरीक्षक बालाजी पदमने,पंकज देवकाते आदींसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या रास्ता रोको आंदोलनाला तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,माजी नगराध्यक्ष अरुण पाटील,नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सूरज पाटील,खंडू दंडगव्हाळ, महेंद्र गायकवाड,भाऊसाहेब सूर्यवंशी,पद्माकर महानुभव,भाजप चे विनोद अहिरे,शहराध्यक्ष उमेश उगले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे-: मात्र मुद्दा क्रमांक ३ मध्ये म्हटल्याप्रमाणे माणिकपुंज धरणातून नांदगाव शहरासाठी झालेली पाणी पुरवठा योजना निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे म्हटले आहे,मात्र ही पाणीपुरवठा योजना राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांनी मंजूर करून आणलेली आहे,आणि त्यांनी सुचवलेल्या ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे,व ही योजना पूर्ण करत असताना नगरपालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता होती.हे विशेष होय.!
Comments
Post a Comment