सा. क्रांतिवीर...राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दाखल्यांसाठी रस्त्यावर उतरणार.!
नांदगाव----संतोष कांदे
ऑनलाइन कारभार सुरू करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न विद्यमान राज्य शासन करत असल्याची बाब स्तुत्य असली तरी,या प्रक्रियेत आर्थिक व मानसिक नुकसान अधिक सोसावे लागत असल्याने विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रक्रियाच राबवावी,अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नेते प्रसाद सोनावणे यांनी येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे केली आहे.
प्रांताधिकारी दराडे यांना आज दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,नुकताच बारावी परीक्षेचा निकाल लागला आहे,या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे काढावी लागतात.मात्र ऑनलाइन प्रक्रियेमुळे सातबारा,किंवा अन्य महसुली दस्तावेज वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही,तसेच या शासकीय वेब साईट वर अनेकदा तांत्रिक खोळंबा नित्याचा झाला आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.म्हणून ह्या शैक्षणिक कालावधी पुरते का होईना,ऑफलाईन कागदपत्रे काढण्याची मुभा द्यावी.अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन छेडेल.असा इशारा शेवटी देण्यात आला आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा चिटणीस मयूर सोनावणे,कलीम शेख,तुषार पवार,शुभम झाल्टे, रौफ शेख,योगेश गवळी,शुभम कोकाटे,प्रतीक खैरनार,अनिल निकम,विरेश सोनावणे आदी उपस्थित होते.
फोटो-: प्रांताधिकारी भीमराज दराडे यांना निवेदन देताना मयूर सोनावणे व कार्यकर्ते.
Comments
Post a Comment