सा. क्रांतिवीर. सामाजिक कार्यात अग्रेसर जॉईंट ग्रुप नांदगाव.!

नांदगाव-----संतोष कांदे

      नांदगांव शहरातील लक्ष्मी नगर येथे मुसलमान बाधवांच्या पवित्र सन रमजान ईंद  व पद्मश्री विजेते जायंटस् ग्रूप मुँबईचे संस्थापक वर्ल्ड चेयरमन नाना चुडासमा यांच्या वाढदिवसा निमित्त जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव तर्फे अल्पोहार व इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.
          जेष्ठ नागरीक संघ, माजी सैनिक, पत्रकार बंधू, युवा वर्ग, व्यापारी वर्ग मोठ्या संखेत उपस्थित होते. या रमजान ईद प्रसंगी जायंटस् ग्रुप तर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांना स्वागत भेट म्हणून पेन देण्यात आले.तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.साळुंके सरांनी वृक्षांचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व विशद केले.
          जायंटस् ग्रुप तर्फे जेष्ठ पत्रकार संजीव निकम,संजीव धामणे,सुरेश शेळके यांचा सत्कार श्यामभाऊ पारख यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पवार यांनी केले.
       कार्यक्रमाच्या प्रसंगी जायंटस् ग्रूपचे अध्यक्ष सुमित गुप्ता, सोमनाथ दुसाने, नंदलाल वर्मा, श्रावन आढाव, अतुल चव्हाण, कुदरतअली शहा, विट्ठल गरुड़, अफजल मुल्ला, पप्पू सय्यद, मोहमद शेख, संजय मोरे, राजकुमार संत, संजय मोकळ, रंगनाथ चव्हाण, जयवंत सालवे, सूरजमल संत, शिवाजी गरुड़, संतोष आण्णा गुप्ता, समाधान पाटिल, विशाल वड़घुले, रमाकांत सोनवणे, पदमाकर दुसाने, वामन पोतदार, सुरेश दंडगव्हाल, उत्तम धात्रक, जगन्नाथ पगार, जेजुरकर बाबा नांदगांव शहरातील नागरिक व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ