सा. क्रांतिवीर.....अफवांवर विश्वास ठेवून निर्दोष लोकांना त्रास देऊ नका-पो.नि. बशीर शेख
नांदगाव---संतोष कांदे
शेजारील औरंगाबाद जिल्ह्यापासून सुरू झालेले अफवांचे पिक नांदगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या गावात, शेतवस्तीवर, वाड्यांवर चोर आले आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत.आणि या अफवांचा फायदा घेऊन चोऱ्या वाढण्याच्या शक्यतेसह,निर्दोष व्यक्तींना त्रास होत आहे.त्यामुळे संशय आल्यास प्रथम पोलिसांना अवगत करावे.असे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे.
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भौरी येथील चोरी वगळता,दुसरी कुठलीही घटना घडलेली नाही.मात्र काही समाजकंटकांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहे तरी आपल्या गावात, शेतवस्तीवर, वाड्यांवर येणारे अपरिचित, संशयित वाटणारे, मनोरूग्ण ( वेडसर), भटके- फिरस्ते लोक, साधूवेशातील संशयित तसेच किरकोळ विक्री करणारे संशयित फेरीवाले यांना परस्पर मारहाण करू नका.
अशावेळी त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करून ते खरच चोर आहेत का की वाटसरू आहेत याचा उलगडा होईल. पोलीस निश्चितपणे अशा गोष्टींची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करतील.
कुणालाही मारहाण करू नये अशा बेदम मारहाणीत एखादी व्यक्ती मयत झाल्यास ३०२ चा गुन्हा दाखल होतो.
नुकताच असा प्रकार पोलीस स्टेशन वैजापूर हद्दीत घडला असून ४०० लोकांवर ३०२ ची कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मिडीयावर चोरीच्या अफवा जास्त प्रमाणात पसरतात तेव्हा प्रकार खरा की खोटा याची नागरीकांनी खात्री करावी व मॅसेज कोणत्या ग्रृपवरून आला त्या ग्रृपच्या नावासह मॅसेज पोलीसांना पाठवा सर्व पत्रकारांनीही अशा पोस्टची खात्री करून पोलीसांना कळवा व सहकार्य करा.
जनतेमध्ये घबराट आणि भीती पसरून त्यातून गुन्हे घडतात. लोकांनी कायदा हातात घेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
एखादी संशयित व्यक्ती आढळून तर कृपया मारहाण करू नका. तिला पोलीसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन करून या
०२५५२-२४२३३३
९१६८७९४७८६ नंबर वर माहिती द्यावी.असे म्हटले आहे.
Comments
Post a Comment