सा. क्रांतिवीर....नांदगाव शहरातील ए.टी.एम निकामी.!
नांदगाव----संतोष कांदे
शहरातील राष्ट्रीयकृत,सहकारी,पतसंस्था आदी बँक ग्राहकांना दर्जेदार सेवा देत असल्या तरी,वेळेअभावी बँकाऐवजी एटीएम चा वापर करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मात्र मनस्तापाशिवाय काहीही मिळत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील काही सुजाण नागरिकांनी सोशल मिडियातुन पत्रकार,राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते यांना उद्देशून केलेल्या आवाहनात 'शहरात पाच ते सहा राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकेच्या शाखा आहेत. येथील नागरिकांना त्या उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील ही आहेत, परंतू गेल्या एक-दीड महिन्यापासून एटीएम मशीन सुरळीत चालत नाहीत,भारतीय स्टेट बँकेचे एटीएम तर केवळ दिखावा म्हणून उरले आहे.तसेच अन्य बँकांची परिस्थिती फारशी वेगळी नाही,अनेक वेळा बँकांचे कामकाज संप, विविध सण, शनिवार, रविवार अशा अनेक निमित्ताने बंद असते,तेव्हा एटीएम चा सुलभ पर्याय उपलब्ध असावा,अशी सर्वसाधारण नागरिकांची अपेक्षा असते.मात्र त्याकडे बँक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागावी.? असा प्रश्न नागरिकांना पडतो.
खात्यावर असलेला हक्काचा पैसा वरील कारणाने महत्वाचे काम असेल तेव्हा उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध अवजारे, खते, बी-बीयाणे खरेदी साठी शहरात येऊन रोकड उपलब्ध होत नसल्याने खाली हात माघारी परतावे लागते,तर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच नुकतेच शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. विविध शाळा, महाविद्यालयात प्रवेश साठी रोकड पैशांची गरज आहे,मात्र पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तरी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी.यांनी यात लक्ष घालून नांदगाव तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment