सा. क्रांतिवीर..आता मिळालेले आयुष्य बोनस.!-आ.भुजबळ

नांदगाव---संतोष कांदे

ज्या कारणाने २२ महिने कारावासात काढावे लागले,त्या प्रस्तावाला मान्यता दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली होती,असे सांगत जीवघेण्या आजारातून बचावलो,त्यामुळे हे आयुष्य बोनस समजतो.आणि आता हे सर्व आयुष्य गोर-गरिबांच्या समस्या मार्गी लावण्यात घालवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील सत्कार समारंभात केले.
      यावेळी व्यासपीठावर माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार,माजी आमदार अड.अनिल आहेर,विधान परिषद चे माजी आमदार जयंत जाधव,न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर,माजी नगराध्यक्ष भास्कर कदम,साहेबराव पाटील,संतोष गुप्ता,कैलास पाटील,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष रमेश पगार उपस्थित होते.
      अमंलबजावणी संचनालय च्या कारावासातून सुटका झाल्यानंतर प्रथमच आमदार छगन भुजबळ नांदगाव तालुक्यात आले होते.सहकुटुंब नस्तनपूर येथील श्री.शनैश्वर देवतेचे दर्शन घेतल्यानंतर आमदार छगन भुजबळ यांचा सत्कार श्री.शनी संस्थान तर्फे आयोजित करण्यात आला होता,त्या सत्काराला उत्तर देताना आ.भुजबळ बोलत होते.
      ते पुढे म्हणाले की,तुरुंगात असताना व बाहेर आल्यानंतर अनेक जण भेटायला आले,मग भाजपच्या मंत्री ना.पंकजा मुंडे असो वा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अशा अनेक नेत्यांचा समावेश होता.त्याचबरोबर माझ्या सुटकेसाठी महाराष्ट्रभर अनेकांनी नवस,संकल्प केले,या लोकांशी माझे रक्ताचे नाते नव्हते,मी त्यांना ओळखत ही नव्हतो,मात्र त्यांचे प्रेम बघून मला रक्ताच्या नात्याबरोबर या आपुलकीच्या नात्याची ही नव्याने ओळख झाली आहे.
     हे बोनस म्हणून मिळालेले आयुष्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच घालवणार.! असा दृढनिश्चय ही त्यांनी व्यक्त केला.तर प्रास्ताविक करताना माजी आमदार अड.अनिल आहेर म्हणाले की,येत्या काळात कसाही प्रसंग येवो,पण भुजबळ साहेबांची साथ सोडणार नाही.कारण त्यांनी या देवस्थान च्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कदापि विसरता येण्यासारखे नाही.त्यामुळेच त्यांच्या सुटकेसाठी येथेही महापूजा करण्यात आली होती.तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो,असे अड.आहेर शेवटी म्हणाले.
      यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ यांचा आमदार पंकज भुजबळ व माजी आमदार अड.अनिल आहेर,जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी संयुक्तिकरित्या सत्कार केला,आमदार भुजबळ यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाताई भुजबळ,सौ.शेफाली समीर भुजबळ,सौ.विशाखा पंकज भुजबळ आदी कुटुंबीय दर्शनासाठी आले होते.
     

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ