सा. क्रांतिवीर...मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
जातेगाव-----अरुण हिंगमिरे
नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे,तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
या बाबत अधिक असे की,गावातील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे,या त्रासाचा फटका महिला,लहान मुले,वृद्ध व्यक्तींना अधिक प्रमाणात बसत आहे. येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या परीसरात तसेच गावातील रस्त्यावर पंधरा ते वीसच्या संख्येने फिरत असलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालवताना असुरक्षित वाटू लागले आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment