सा. क्रांतिवीर....जळगाव बुद्रुक ला कृत्रिम पाणी टंचाई ; पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी.!

नांदगाव---/संतोष कांदे

तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे उदभव विहिरीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे,मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ह्या पाणी पुरवठा योजनेत वारंवार बिघाड होत असल्याने टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
      या बाबत अधिक असे की,धरण उशाला अन कोरड घशाला.! अशी जळगाव बुद्रुक ची गत आहे.माजी सरपंच दत्तात्रय कांदे यांनी जळगाव बुद्रुक साठी सुमारे ८० लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती,मात्र गावातील काही विघ्नसंतुष्ठ व्यक्तींनी या योजनेसाठी विहिरीची जागा मिळू दिली नाही,परिणामी योजना गुंडाळून ठेवावी लागली.
     विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा कामी सुरुवातीस चांगले प्रयत्न केले,मात्र नंतर त्यांच्यातच बेबनाव झाल्याने गावाला हकनाक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.तरी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी पाण्याचा टँकर सुरू करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.!

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ