सुरळीत वीज पुरवठा कामी मनमाड शिवसेनेचा इशारा.!
सा.क्रांतिवीर
नांदगाव----संतोष कांदे
मनमाड शहरातील विस्कळीत वीज पुरवठा प्रश्नी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले,व सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
मनमाड शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासुन वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री.डोंगरे,श्री.जाधव यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
यावेळी संबधित अधिकारी वर्गाने खंडित वीज पुरवठ्याबाबत दिलगीरी व्यक्त केली.या बैठकीत खंडित वीज पुरवठ्यासह वीज वितरणच्या अनेक तांत्रिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळात शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, उपप्रमुख जाफर मिर्झा, प्रवीण धाकराव, अनिल दराडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष योगेश इमले, शहर संघटक निलेश ताठे, महेंद्र गरुड, मिलिंद पाथरकर, युवा सेना शहर सचिव स्वराज देशमुख, प्रफुल्ल चिंधे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment