माजी आमदार अड.अनिल आहेर यांचा वाढदिवस निसर्गाचे संवर्धन करत साजरा.

नांदगाव -------संतोष कांदे

  राजकारणातून समाजकारण करत जनतेची सेवा केली.त्यातून सत्तेची अनेक पदे भूषवता आली,अन त्या पदांच्या माध्यमातूनही सर्वांच्या समस्या दुःख दूर करण्याचाच प्रयत्न केला.मात्र आता राजकारणात फक्त भावी पिढीसाठी मार्गदर्शक,म्हणून तर निसर्गाची सेवा करत उरलेले आयुष्य कारणी लावायचे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता वृक्षांचा वर्धापन दिन वृक्षारोपण कार्यक्रमात केले.
      यावेळी अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते.तर व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार,विनोद शेलार,मनमाड चे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,माजी नगराध्यक्ष भास्कर कदम,गिरणानगरचे सरपंच शिवाजी कवडे,जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,भाजपचे जिल्हा सरचिटणीस भावराव निकम,माजी उपनगराध्यक्ष शिवाजी पाटील,सजनतात्या कवडे,रमेश पगार,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सुनीता आहेर,विलासराव देशमुख,आदी उपस्थित होते.
      यावेळी माजी आमदार अड.आहेर पुढे बोलताना म्हणाले की,माझ्यावर अपार प्रेम केले,त्याच प्रेमाच्या शिदोरीवर आजपर्यंतची वाटचाल सुखद राहिली आहे.नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवून आता निसर्गाची पर्यायाने बळीराजाचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.असे ते शेवटी म्हणाले.
       यावेळी माजी आमदार संजय पवार,भाजपचे भावराव निकम,भास्कर कदम,विनोद शेलार,संतोष गुप्ता,यांनी आपल्या भाषणातून अड.आहेरांच्या कार्याचा उचित गौरव केला,तर अड.आहेर यांच्या कन्या तथा जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी 'दादा' यांनी माझ्यासह अनेकांना घडवले,मात्र हे करत असताना त्यांना सौ.सुनीता आहेर यांची खंबीर साथ लाभल्यानेच ते सर्व करू शकले.तसेच ते स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असल्याची जाहीर तक्रार करत काळजी घेण्याचे भावनिक आवाहन ही यावेळी केले.
      जेष्ठ नेते तथा अड.आहेर यांचे सहकारी कारभारी पाटील यांचे नुकतेच निधन झाले असल्याने वाढदिवस साजरा न करता  गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्त ६० जेष्ठ ग्रामस्थांचा सत्कार करण्यासह पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
      तसेच नवीन वृक्षांची ही लागवड करण्यात आली.आणि नेहमीप्रमाणे ह्या ही वाढदिवसाला अवकाळी पावसाने जोरदार  हजेरी लावली.प्रास्ताविक शिक्षक नेते राजेंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार संदीप देशपांडे यांनी केले.
     या कार्यक्रमासाठी डॉ.प्रभाकर पवार,उदय पाटील,उदय पवार,दर्शन आहेर,सागर साळुंके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील,भास्कर शेवाळे,विजय चोपडा,डॉ.शरद आहेर,जगन पाटील,आदींनी कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ