अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी

नांदगाव-----संतोष कांदे

शहरातील अहिल्यादेवी नगर (हमालवाडा) येथे अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
       दिनांक ३१ मे रोजी अहिल्यादेवी जयंती निमित्ताने व्याख्यान  व भंडारा चा  जाहिर कार्यक्रम सकाळी १०ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले होता.सर्वप्रथम प्रमुख पाहुणे च्या हस्ते हमालवाडा नांदगाव या वस्तीचे नाव "अहिल्यादेवी नगर" असे नामकरण बोर्डाचे उदघाटन नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे,उपनगराध्यक्षा कामिनी साळवे,आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड,भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,माजी उपनगराध्यक्ष शिवाजी पाटील,जेष्ठ पत्रकार भास्करराव कदम,सुभाष मासुळे सर नगरसेवक किरण देवरे,नगरसेवक कारभारी शिंदे,नगरसेवक नितिन जाधव,रंगनाथ चव्हाण लताताई कळमकर,बाळु शिंदे,गंगाधर करणर ,राजाभाऊ जगताप,शामभाऊ काकळीज,अड.सचिन साळवे,राजेंद्र गांगुर्डे, उपस्थित होते.
      लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीचे कार्यकर्तृत्व, दातृत्व,मातृत्व व जीवन पटावर प्रमुख मान्यवरांनी प्रकाशझोत टाकला,समाज व बहुजन समाज संघटन होऊन सत्ता,शिक्षण आणि आरक्षण यासाठी समाजातील युवकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन व्याख्यानकार सुभाष मासुळे सर यांनी केले.
    व्याख्यान नंतर भंडारा चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी सुमारे सव्वाशे ते दीडशे महिला व मोठ्यासंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ