नांदगाव विशेष
नांदगाव संतोष कांदे
तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर सदिच्छा भेट घेतल्याने नांदगाव विधानसभा मतदार संघात मोठी खळबळ उडाली आहे.
ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी नुकताच माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना जामीन झाला आहे,आणि रुग्णालयात भेटीसाठी गेलेल्या समता परिषदेच्या दिलीप खैरे यांनी आमदार छगन भुजबळ यांचा भगवी शाल घालून केलेल्या सत्काराचे फोटो कालच सोशल मिडियात फिरत होते,आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार पंकज भुजबळ यांनी श्री.ठाकरे यांची घेतलेली भेट ; राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.
यातून मोठे भुजबळ पुत्र पंकज ला शिवसेनेत प्रवेश देऊन नांदगाव ची गादी पक्की करताहेत का.? असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
Comments
Post a Comment