सा.दामिनी
शासकीय पाण्याचा असाही उपयोग.?
नांदगाव ----संतोष कांदे
पाण्याचा टँकर सुरू व्हावा,यासाठी ग्रामपंचायतींना कुलूप ठोकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत,शासकीय टँकर मधून थेट हौदात पडणारे पाणी खरेच पिण्यासाठीच वापरले जात आहे का.? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.
या बाबत अधिक असे की,येवला नांदगाव रस्त्यालगत असलेल्या बाणगांव बुद्रुक,खिर्डी, आदी गावांना शासकीय टँकर द्वारे पाणी पुरवठा सद्यस्थितीत सुरू आहे.आणि या गावांतील ग्रामस्थांच्या आग्रही मागणी व आंदोलनानंतर हे टँकर सुरू करण्यात आले आहेत.आणि पिण्यासाठीच पाणी हवे,किंवा त्याच स्वरूपाचा संबधित ग्रामसेवकांचा प्रस्ताव ही सादर झालेला आहे.
आज मात्र प्रस्तुत प्रतिनिधीला नांदगाव येवला रस्त्यावरील बाणगांव बुद्रुक व खिर्डी गावाच्या मधोमध रस्त्यालगत असलेल्या एका वस्तीवर शासकीय टँकर (क्रमांक-एम. टी. एस.५५७९) यातून पाणी चक्क जेथे पाळीव जनावरे पाणी पितात त्या हौदात टाकले जात होते.तसेच या रस्त्याच्या कडेला अनेक हिरव्या रंगाच्या टाक्या भरलेल्या आढळून आल्या,तर प्रश्न असा उपस्थित होतो की,हे पाणी खरेच पिण्यासाठी वापरले जात असावे का.?
Comments
Post a Comment