सा.दामिनी

नांदगाव------संतोष कांदे

  मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पूर्वतयारी ची महत्वपूर्ण बैठक जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली.

        आज (दि.१७ मे) झालेल्या या बैठकीमध्ये रमजान ईद साजरी करत असताना मुस्लिम बांधवांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत,यासह अनेक शासकीय विभागांकडून सर्व सोयी-सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
  यावेळी पोलीस अधीक्षक  संजय दराडे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक  हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी अजय मोरे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता राहुल पाटील, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनीलसिंग राठोड, ,पोलीस उपअधीक्षक  गजानन राजमाने,पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे,पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे,पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह मालेगाव विभागातील १८ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच मालेगाव महानगरपालिकेचे अभियंता सचिन माळवाल    उपस्थित होते.
         

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ