नांदगाव विशेष

नांदगाव   संतोष कांदे
         
            नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे रोख देण्यासंदर्भात संचालक मंडळाने ठोस निर्णय घेतला आहे.तो निर्णय व्यापारी वर्गाने मान्य केल्याने उद्यापासून (दि.१४) बाजार समिती आवारातील लिलावाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे व सचिव अमोल खैरनार यांनी दिली.
       रोख पेमेंट च्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी लिलाव बंद ची भूमिका बाजार समिती सभापती कवडे व संचालक मंडळाने घेतली होती.त्यावर गुरुवारी व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी संघटना,राजकीय पक्ष यांनी शेतकरी वर्गाची आर्थिक कुचंबना होऊ नये,ही भूमिका लावून धरली परिणामी रोख पेमेंट चा मुद्दा मान्य झाल्याने उद्या सोमवार पासून लिलाव सुरू होणार आहेत.
       प्रतिक्रिया-: अमोल खैरनार सचिव -:नांदगाव,बोलठाण व न्यायडोंगरी उपबाजारसमिती आवारावरील कांदा, मका व भुसाराचे लिलावाचे कामकाज नियमितपणे चालू होत असून शेतमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अथवा रोख उपलब्ध नसल्यास त्याच तारखेचा बेअरर चेक घ्यावा. याबाबत काही तक्रार असल्यास ४८ तासाचे आत बाजारसमिती कार्यालयात तक्रार द्यावी ४८ तासानंतर तक्रार आल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी तरी आपला शेतमाल नांदगाव बाजारसमिती आवारावर विक्रीस आणावा.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ