सा.दामिनी
'सासरी जात असलेल्या विवाहीतेला धावत्या रेल्वेत सर्पदंश.!
नांदगाव ---संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील माहेर असलेल्या एका विवाहीतेला सासरी जात असताना धुळे रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेत सर्पदंश झाल्याची गंभीर घटना घडली.मात्र रेल्वे प्रवाशांच्या प्रसंगावधनाने तिचा जीव वाचला आहे.
या बाबत अधिक असे की,धुळे येथील सासर असलेली एक विवाहिता आपल्या माहेरी जळगाव बुद्रुक येथे उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मुलांना घेऊन आलेली होती.सुट्ट्या संपल्यानंतर ती मुलांना घेऊन चाळीसगांव (जिल्हा जळगाव) येथून गुजरात कडे जाणाऱ्या रेल्वेने धुळे येथे जाण्यासाठी बसली.गाडीत गर्दी असल्याने हातातले सामान सीटखाली ठेवत असतानाच,या धावत्या रेल्वेतच सीटखाली असलेल्या एका विषारी सर्पाने दंश केला.तिची किंकाळी ऐकुन रेल्वे प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली.
तेव्हा काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या सर्पाला तेथेच अडकून ठेवण्याची तजवीज केली,व १०८ या रुग्णवाहिकेला दूरध्वनी वरून कल्पना दिली.काही वेळातच धुळे रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोहचताच,ही रुग्णवाहिका ही हजर झाली,त्यातून या बाधित विवाहीतेला प्रवाशांनी धुळे जिल्हा रुग्णालयात हजर केले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या महिलेचे प्राण वाचवले.
मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
Comments
Post a Comment