दामिनी

नांदगाव ---//संतोष कांदे

नाग्यासाक्या धरणासाठी राहती जागा संपादित झाल्याने विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन केले खरे,मात्र मूलभूत सुविधा आजही मिळत नसल्याने शेकडो आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालय गाठून कैफियत मांडली. आणि आजच्या काळात ही इतक्या दयनीय अवस्थेत राहत असलेल्यांच्या व्यथा ऐकून तहसीलदार ही क्षणभर अवाक झाले.
        संपादित केलेल्या जागेच्या बदल्यात ३६ पक्की बांधून,उदरनिर्वाहसाठी अविभाज्य नवीन शर्तीची शेती देण्याचे अभिवचन देण्यात आले होते.सन १९९०-९१ मध्ये ३६ घरकुल मंजूर करण्यात आली.मात्र तब्बल २८ वर्षे उलटून गेली,तरी या घरांचा पाया खोदण्यास ही मुहूर्त मिळालेला नाही,त्यानंतर मात्र ग्रामपंचायती कडून इंदिरा आवास योजनेअंतर्गत ९ घरकुल बांधून देण्यात आली आहेत,तसेच यंदा ही १५ घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
     स्वस्त धान्य साठी शिधापत्रिका,विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले,सातबारा उतारे आदी महत्वाचे दस्तावेज तरी मिळावेत,यास्तव या १०० पेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी थेट तहसीलदार योगेश जमदाडे यांचे कार्यालय गाठून ठाण मांडले.त्याचबरोबर वीज वितरण कंपनीकडून या ठिकाणी वीज पुरवठा कामी १६ पोल देण्यात आले होते,त्यापैकी ८ पोल चोरीस गेल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.
     तर शासनाकडून या इयत्ता १ ली.ते ४ थी पर्यंत येथे शाळा सुरू आहे,मात्र दोन शिक्षकी असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांना कपडे देण्यासाठी येथील शिक्षकांनी प्रति विद्यार्थी ५०० रुपये घेतल्याची तोंडी तक्रार ही या आदिवासी बांधवांनी यावेळी तहसीलदार जमदाडे यांच्याकडे केली.
      वीज वितरण कंपनीचे वायरमन गावात हजर असताना वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक दुरुस्त्या खाजगी लोक करत असल्याची धक्कादायक माहिती लेखी स्वरूपात तहसीलदारांना यावेळी देण्यात आली.
     यावेळी पांडू मोरे,बबन सोनावणे,अनिल पवार,निवृत्ती मोरे,भागीनाथ जाधव,सुनील दाते,बाळा माळी, व विजय परडे यांनी या आदिवासी बांधवांची बाजू मांडली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ