सा.दामिनी
नांदगाव ---- संतोष कांदे
आज निकाल लागलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथील श्री. छ. शिवाजी महाराज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या विद्यालयातील शिवकन्या अंबादास ढगे हिने ७६.७६% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रद्धा वाल्मिक शिंदे हिने ७५% गुण मिळवून द्वितीय तर पुजा बाळनाथ सरोवर हिने ७४% गुण मिळवून तृृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याचबरोबर शुभांगी रमेश शिंदे हिने ७३.६९% गुण प्राप्त केल्याने चतुर्थ क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य.भट सर,ज्यु. कॉलेजचे प्रााध्यापक महाजन सर, नंद सर,शेलार सर, मोरे सर, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नहार सचिव सुरेंद्र नहाटा उपअध्यक्ष. मोहनलाल सोनी व सर्व संचालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment