सा.दामिनी

नांदगाव --//संतोष कांदे

नाशिक शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषदेची इमारत म्हणजे कोणीही या अन्‌ पार्कींग करुन जा अशी स्थिती. गेल्या अनेक वर्षांत प्रयत्न करुनही ही समस्या सुटत नव्हती. नवे सीईओ नरेश गिते यांनी पुढाकार घेत नामी शक्कल शोधली. दुचाकी पार्कींगसाठी जागा निश्‍चित केली. ते स्वतः गेटवर येऊन थांबले अन्‌ ओळखपत्र तपासणी करुनच वाहने बाहेर सोडली. त्यामुळे बाहेरच्या दुचाकीस्वारांची अक्षरशः पळापळ झाली. अन्‌ दोनच दिवसांत हा प्रश्‍न सुटला.

शुक्रवारी कार्यालयीन कामकाज संपल्यावर सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ओळखपत्र तपासल्यावरच दुचाकी वाहने बाहेर सोडण्याच्या सुचना केल्या. या कर्मचाऱ्यांना कोणी जुमानले नाही तर अडचण होऊ नये यासाठी डॉ. गिते स्वतः गेटवर येऊन थांबले. तेव्हा ओळखपत्र तपासल्यावर बाहेर सोडले जात असल्याचे लोकांच्या लक्षात आले. तेव्हा पार्कींग करुन बाहेरे गेलेल्यांची अक्षरशः पळापळ झाली. आवारामध्ये जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यक्तीरिक्त इतर दुचाकी वाहनचालक हे वाहने लावून जातात. त्यामुळे कार्यालयाला मात्र बकाल स्वरुप आहे. त्यावर पर्याय सापडला.

स्वतंत्रपणे दुचाकी लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक वाहन तेथे लावली जात असल्याचे दिसून आले. कोण वाहने लावतो याचा शोध घेण्यासाठी सायंकाळी कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर ओळखपत्राशिवाय कुठलेचे वाहन न सोडण्याचे आदेश गिते यांनी सुरक्षारक्षकांना दिले. सुरक्षारक्षकांनी ओळखपत्राची तपासणी सुरू करताच डॉ. गिते हे प्रवेशद्वारावर येवून थांबले. त्यांनी ओळखपत्रांची तपासणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर दिले जावू लागले. यापुढे ओळखपत्राशिवाय कुणालाही जिल्हा परिषद आवारात वाहन लावण्यास अटकाव करण्यात येणार आहे. अनधिकृतपणे वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ