दामिनी

नांदगाव----संतोष कांदे

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांचे आमदार होण्याचे स्वप्न विधान परिषद निवडणुकीतून का होईना पूर्ण झाले आहे.आणि या निकालाने शिवसेनेच्या नांदगाव विधानसभा मतदार संघावरचा दावा ही अधिक प्रबळ झाला आहे.
      विधान परिषद निवडणुकीत ठराविक मतदार मतदान करत असले तरी ते मतदार सर्वसामान्य मतदारांमधून निवडून गेलेले असतात,आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दिलेला कौल सर्व सामान्य जनतेला मान्य असावा,असे गृहीत धरले जाते.
       येवल्यातून गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीची स्वप्न पाहत असताना माजी मंत्री छगन भुजबळांच्या राजकीय एन्ट्रीने दराडेंच्या स्वप्नांना करकचून ब्रेक लागला होता.तसेच एकदा तर आमदारकीने अगदी जवळून हुल दिली होती.आमदार दराडेंचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने नांदगाव तालुक्यातील शिवसेनेच्या आशा ही पल्लवित झाल्या आहेत.
         ऐन विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना जामीन मिळाला.आणि गत दहा वर्षात जिल्ह्यात साहेबांनी जे वर्चस्व निर्माण केले होते,त्याला अनुसरून या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक मानली जात होती.दराडे यांचा विजय झाल्याने अनेक चर्चांना तालुक्यात ऊत आला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ