दामिनी

नांदगाव ------संतोष कांदे

एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात आधुनिकता आली आहे.त्याचबरोबर सोशल मीडियामुळे उतावीळपणा आलाच,पण संवेदनशीलता ही वाढली आहे.आणि अशा परिस्थितीत परदेशी संस्कृतीला ही मागे टाकेल अशा घटना मात्र रक्ताच्या नात्यात घडू लागल्याने शरमेने मान खाली जात आहे.
       काही वर्षांपूर्वी नाते-संबंधात आक्षेपार्ह घटना घडल्या तर टीव्ही ला दोष देत पांघरून घातले जात होते.आणि आता घडलेल्या घटनांचे खापर मोबाईल वर फोडून पुन्हा तीच री ओढली जात आहे.एकाच आईच्या उदरात जन्म घेतलेल्या लेकरांकडून अक्षम्य अपराध घडत आहेत.आणि समाजाच्या भीतीने पालक त्यावर पांघरून घालून या गोष्टीला खतपाणी च घालत आहेत.
      बहीण-भावाचे नाते विसरून फक्त नर आणि मादी इतकेच नाते लक्षात ठेवून वागणाऱ्या या तरुणाई ला आपली चूक लक्षात आल्यानंतर इहलोकाची वाट धरावी लागत असली तरी घडलेला प्रकार आई-वडिलांना किती मरणयातना देत असेल,याचा विचार ही न केलेला बरा.!
      आणि समाजात माय मरो अन मावशी जगो असे म्हटले जाते,मग त्याच न्यायाने मावशीची मुलगी ही बहिणीच.! पण त्याही नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार असो,किंवा मामाकडून थेट बहिणीची मुलगी म्हणजे भाचीला प्रेम बंधनात अडकून नात्याला कलंक लावला जात असल्याचे प्रकार ही लांच्छनास्पद म्हटले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ