दामिनी
नांदगाव----संतोष कांदे
शेतकऱ्यांच्या प्रशांची तड लागावी म्हणून देशाच्या राष्ट्रपतींनी शेतकरी प्रश्नांवर विशेष अधिवेशन बोलवावे,यास्तव राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतीना पत्र द्यावे.यास्तव संबधित आमदार,खासदार यांच्या निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या बाबत अधिक असे की,येत्या २५ मे रोजी या सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे.या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २३ मे रोजी नांदगाव शहरातील शासकीय विश्रामगृहात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परशराम शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण,आम आदमी पार्टी चे विशाल वडघुले,शिवबा ग्रुप चे अशोक निकम,प्रहार चे तालुकाध्यक्ष डॉ.पगार,देविदास देवरे आदी मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीसाठी व सत्याग्रहासाठी शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निलेश चव्हाण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment