नांदगाव तालुका विशेष

नांदगाव     संतोष कांदे

ग्रामीण असो वा ग्रामीण भागातून उपजीविकेची सोय करण्यासाठी शहरात गेलेल्या सामान्य कष्टकरी लोकांच्या श्रद्धेवर अनेकांच्या घरातील चूल पेटते.त्यामुळे या लबाडीला विरोध कसा करणार.? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो.       अनेक शहरात ज्या भागात झोपडपट्टी वा कामगार,कष्टकरी वर्ग जेथे बहुसंख्येने वास्तव्य करून असतो,तेथे व ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांचे विरुंगळ्याचे ठिकाण असलेल्या पाराच्या ओट्यावर या श्रद्धेचा बाजार मांडून घर चालवणाऱ्याची दुकाने थाटली जातात.       आयुर्वेदाच्या नावाखाली कुठलाही झाडपाला खपवला जातो.जेथे विज्ञान ही थांबते,त्या ही आजारावर हे औषध गुणकारी असल्याचे बिनदिक्कत ठोकून दिले जाते.यातून मात्र काहीवेळा ज्या आजारावर हे औषध दिले जाते,ते दुसऱ्याच आजारावर गुणकारी ठरल्याने या वरचा विश्वास दृढ ठरतो.आणि या माऊथ पब्लिसिटीने पुन्हा आयुर्वेदाचे ग्राहक वाढतात.      तीच गत यांच्याबरोबर तुळजापूर,गाणगापूर, किंवा अन्य देवतांच्या नावाने कपडे,धान्य,तेल,किंवा भंडारा करण्यासाठी रोख रक्कम गोळा करणारे यांची असते.ते ही ग्रामस्थांकडून श्रद्धेच्या नावाखाली घेतलेल्या वस्तू सांगितलेल्या ठिकाणी कितपत पोचवतात,हा संशोधनाचा विषय ठरावा.मात्र जो पर्यंत लोकांच्या श्रद्धेला तडा जात नाही,तो पर्यंत यांच्या घरातील चूल पेटती राहील.यात काही शंका नाही.!

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ