सा.दामिनी

नांदगाव संतोष कांदे

नांदगाव- प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन व श्री.शनी देवतेच्या अस्तित्वाने भारलेल्या नस्तनपूर येथे गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा  पारायण सोहळा सांगता समारोह व श्री शनैश्वर महाराज जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
         यावेळी  ह.भ.प.तुकाराम महाराज जेऊरकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.यावेळी संस्थांनचे जन.सेक्रेटरी  मा.आ
.अँड अनिल आहेर यांनी नस्तनपूर येथील धार्मिक परंपरेचा आढावा घेऊन याकामी अविरत परिश्रम घेणाऱ्या व सढळ हाताने मदत करणाऱ्या भाविकांचे मनपूर्वक आभार मानले.
         या निमित्ताने श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिरात उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवा निमित्त दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, संस्थांनचे अध्यक्ष नारायण अग्रवाल विश्वस्त खासेराव सुर्वे,उदयआप्पा पवार व पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
         तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली सय्यद,नागपूरचे उद्योजक दीपक जैसवाल,सुरेश अग्रवाल,डॉ शरद आहेर,राजेंद्र आहेर,विष्णू आहेर,भास्कर शेवाळे, कैलास गायकवाड, दत्तू पवार,बाळासाहेब पवार,हरेश्वर सुर्वे,संदीप मवाळ, राजेंद्र चाकणकर,विठोबा मवाळ,वामन चौधरी,सुनील पवार,महेश आहेर,भास्कर सोलसे,विनय पाटील,बाळू मामा पवार व विश्वस्त मंडळाचे सदस्यासह अनेक मान्यवर उपस्तीथ होते.सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले पंचक्रोशीतील तरुण मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.
            नस्तनपूर येथे गाथा पारायण साप्ताह निमित्त व शनी महाराज जन्मोत्सवा निमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर मंदिराची व परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती येथील निसर्गरम्य वातावरण व धर्मप्रेमीना भावणाऱ्या आकर्षक सजावाटीस सर्वांनी दाद दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ