नांदगाव विशेष बातमी

नांदगाव  संतोष कांदे

  पेट्रोलच्या महागाईने सर्वसामान्य दुचाकी स्वार मेटाकुटीस आले आहेत.यापूर्वी ५० ते २० रुपयांचे पेट्रोल टाकून का होईना हौस पूर्ण केली जात होती,मात्र आता ते ही शक्य नाही.नेमकी हिच बाब हेरून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची पेट्रोल टाकी च चोरी करून त्या दुचाकी मालकाची पेट्रोलच्या महागाई पासून सुटका केली की काय.? अशी गमतीशीर चर्चा नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात सुरू आहे.
     त्याचे असे झाले की,येथील व्यापारी महेंद्र रायसोनी यांची बजाज कंपनीची डिस्कव्हर (गाडी क्रमांक-एम. एच ४१ आर २३७९) गाडी शनिवारी रात्री घरासमोर नेहमीप्रमाणे उभी केलेली होती.अज्ञात चोरांनी गाडी चोरण्याऐवजी गाडीची पेट्रोल टाकीच चोरून नेली.
      सकाळी हा प्रकार बघताच रायसोनी यांना हसावे की,रडावे हा प्रश्न पडला.कारण नुसत्या पेट्रोल टाकीची तक्रार कशी नोंदवणार.? असा यक्ष प्रश्न रायसोनी यांना पडला नसेल तर नवलच.!

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ