नांदगाव विशेष बातमी

नांदगाव  संतोष कांदे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदगाव तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी  विशेष पथकांद्वारे तालुक्यातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र यांची गोपनीय तपासणी करण्यात आली.यात नागापूर ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी क्रमाक १ गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचे व कामकाजात गंभीर चुका आढळून आल्याने अंगणवाडीतील सेविकेस सेवेतून काढण्याचे तसेच पर्यवेक्षिकेची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश तसेच  तांदूळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे दप्तर हस्तांतर होऊनही याबाबत खोटी माहिती देणाऱ्या ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
        ग्रामपंचायतीमधून बदली होऊनही पाणी पुरवठा योजनांचे दप्तर हस्तांतर न करणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचनाही डॉ गिते यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ गिते यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा व प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर वैठ्कांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज नांदगाव तालुक्याची आढावा बैठक तहसील कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला गोपनीय पथकांनी तपासलेल्या शासकीय कार्यालयांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नागापूर येथील अंगणवाडी गेल्या ५ दिवसापासून बंद असल्याचे निदर्शनात आले. तसेच गरम आहार वाटप नसल्याचे, हजेरी रजिस्टर भरलेले नसल्याचे, मागील गरम आहार नमुन्यात अळ्या व बुरशी असल्याचे, पाण्याच्या ड्रममध्ये मुंग्या असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. याबाबत अंगणवाडी सेविका व पर्याविक्षिकेस जबाबदार धरून त्यांचेवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. हिसवळ खु क्रमांक २ च्या अंगणवाडीमध्येही काही बाबतीत अनिमियातता आढळून आल्याने पर्यावेक्षिकेस नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. तांदूळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे दप्तर हस्तांतर होऊनही याबाबत खोटी माहिती देणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पवन वाघ याचेवर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

कुपोषणाबाबत डॉ गिते यांनी सविस्तर आढावा घेत बालकांना आहार संहितेनुसार आहार देण्याबाबत निर्देश देण्यात आले. बाल ग्राम विकास केंद्राबाबत आढावा घेऊन लवकरच आवश्यकतेनुसार बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डॉ गिते यांनी सांगितले. यावेळी कुपोषणा संदर्भात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, पर्यवेक्षिका, वैद्यकीय अधिकारी आदींचा सविस्तर आढावा घेऊन त्यांना माहिती विचारण्यात आली. बाल ग्राम विकास केंद्रातील आहार व पोषण संहिता याबाबत  पुरेशी माहिती नसल्याने सदर कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर पुन्हा प्रशिक्षण घेण्याचे आदेश डॉ गिते यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी प्रत्येकाची असून गाव विकास आराखड्याचा १० टक्के निधीतून यासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी परिसरात ५ झाड(शेवगा, पेरू, लिंबू इ.) लावून त्यांचे संगोपन करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी दिले. कुपोषण हा जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा विषय असून याकडे अधिक लक्ष देण्याचे आदेशही डॉ गिते यांनी दिले.

वृक्ष लागवडीचा आढावा घेताना सर्व ग्रामसेवकांनी खड्डे खोदल्याचे सांगितले मात्र तपासणी पथकाला कुठेही खड्डे आढळून न आल्याने डॉ गिते यांनी याबाबत सत्य परिस्थितीची माहिती देण्याचे आदेश ग्रामसेवकांना दिले यातून अद्याप तालुक्यात खड्डे खोदण्याचे काम सुरु नसल्याचे ग्रामसेवकांच्या माहितीवरून निदर्शनात आले. लोकसहभागातून तत्काळ खड्डे खोदण्याचे व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबवून यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेला सहभागी करून घेण्याचे आदेश देण्यात आले.

सिंचन विहिर, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश सर्व संबंधिताना देण्यात आले. जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात लेखा शक पूर्ततेबाबत तालुकास्तरावर विशेष शिबीर आयोजित केले असून त्यावेळी अपूर्ण बांधकामाबाबत ज्यांचे काम असमाधानकारक असेल व उद्दिष्ट पूर्ती नसेल त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

यावेळी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदि विभागांचा आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ