नांदगाव तालुका राजकीय विशेष

जळगाव बुद्रुक    संतोष कांदे

गत विधानसभा निवडणुकीच्या पाच वर्षे कार्यकाळात आमदार पंकज भुजबळ यांनी जी भव्य-दिव्य विकासकामे केली,त्यामुळे साहजिकच सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी केला.मात्र ह्या पाच वर्षात दाखवता येईल,असे एकही काम न झाल्याने जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला.तर दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन पराभूत झालेल्या सुहास कांदे यांनी त्यानंतर मात्र तालुक्यातल्या सर्वच सत्ता काबीज करत भुजबळांना चांगलाच शह दिला आहे.मात्र बाहेरून आलेले भुजबळ येथे आमदार होऊ शकतात.मग आपण का नाही.? या भावनेने झपाटलेले अनेक हौशी भावी आमदार नांदगाव तालुक्याचा दौरा करून जनतेचा कल घेत आहेत.यात शिक्षण सम्राट ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे.
        भुजबळ यांच्या पहिल्या आमदारकीच्या कार्यकाळात काँग्रेस व राष्ट्रवादीला भरभराटीचे दिवस होते.कारण फक्त आवक सुरू होती,मात्र सत्ताबद्दल अन त्यानंतर भुजबळ यांच्या तुरुंगवारी नंतर सारेच चक्र उलटे फिरले आहे.आमदारकी वगळता सर्व सत्ता शिवसेना-भाजप च्या ताब्यात गेल्या आहेत.किंबहुना अधिक संख्येने शिवसेनेचेच वर्चस्व दिसून येते.तर काँग्रेस चा किरकोळ अपवाद वगळता राष्ट्रवादी ची अवस्था दयनीय झाली आहे.
     अवघ्या दीड वर्षावर आलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुका मात्र तरीही शिवसेना-भाजप वगळता सुनसान शांतता आहे.विकासकामांच्या बाबतीत नापास असलेल्या आमदार पंकज भुजबळ यांना मोठ्या भुजबळांवरील अन्यायाच्या सहानुभूतीचा फायदा मिळू पाहतोय,ही एकच काय ती जमेची बाजू आहे.तर काँग्रेसच्या हौशी कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून  न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर यांना भावी आमदार म्हणून प्रमोट केले जात आहे.माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्याप्रमाणेच त्यांचा अभ्यासू लोकप्रतिनिधी असा लौकिक निर्माण होऊ पाहतोय.
     गत विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यावर चांगलीच पकड निर्माण केली आहे.ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांच्या मदतीने जिल्हा परिषद,जिल्हा बँक,जिल्हा मजूर संस्था,जिल्हा औद्योगिक संघ,या जिल्हा स्तरीय संस्थांसह तालुका पातळीवरील दोन्ही नगरपालिका,दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या,पंचायत समिती,जिल्हा परिषदचे  दोन गट ताब्यात घेऊन कार्यभार सुरू आहे.आणि नुकतीच दोन कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजन करण्यात आली आहेत.
        अलीकडच्या काही दिवसांपूर्वी संगमनेर येथे अनेक शैक्षणिक संस्था असलेल्या एका व्यक्तीने नांदगाव शहरात भव्य रोग निदान शिबिर घेतले.आणि समारोप प्रसंगी लांबलचक भाषण ही ठोकले.या भाषणाचा कल बघता,ते या मतदार संघाचा कानोसा घेत असल्याचे जाणवत होते.त्यानंतर मुंबई येथे राज्य शासनाच्या सेवेत असलेले एक सनदी अधिकारी सदस्थितीत तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.सध्या त्यांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे विधानसभा निवडणूक किंवा प्रतिनिधित्व करण्याच्या बाबी उघड होत नसल्यातरी हेतू तोच दिसतो आहे.कारण ज्या वेळी ते जिल्ह्यात कार्यरत होते,तेव्हा त्यांनी या तालुक्यात असा दौरा केल्याचे जनतेच्या स्मरणात नाही.मात्र आता तालुका,जिल्हा कार्यक्षेत्र नसताना केवळ तालुका जन्मभूमी आहे,केवळ या मुद्द्यावर जनतेच्या भेटीगाठी हा विषय काही पचनी पडताना दिसत नाही.
    भाजप शासन मध्ये विद्यमान मंत्री महोदय यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या या अधिकाऱ्याच्या दौऱ्यामुळे या तालुक्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या गोटात खळबळ मात्र नक्की उडाली आहे.


Comments

  1. एकदम योग्य प्रकारे सद्य परिस्थिती वर्णन करणारे राजकीय विश्लेषण केलं आहे,परंतु येणाऱ्या काळात अजूनही यापेक्षा वेगळी राजकीय समिकरणे बघावयास मिळू शकतात. येणाऱ्या काही दिवसात युती आणि आघाडी यासोबतच नाराज होणारे इच्छुकांची वेगवेगळी तत्कालीन भुमीका महत्वाची असु शकते.

    ReplyDelete
    Replies
    1. ओके पण आपले नाव कळू शकेल काय.?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ