Posts

Showing posts from November, 2024

आमदार सुहास कांदे यांच्या विजयाला सौ. अंजुमताई कांदे यांचा ही हातभार.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (nashik)  संतोष कांदे  असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्या घरातील स्त्रीचा हात असतो. काही अपवाद सोडता ही उक्ती खरी ठरत असल्याचे दिसून येते. अगदी यांचप्रमाणे नांदगाव विधानसभा मतदार संघातून सुमारे ९० हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या विजयात ज्या प्रमाणे सर्व नेते, कार्यकर्ते, आणि जनता यांचा सहभाग असला तरी सौ. अंजुमताईंनी या विजयासाठी केलेले प्रयत्न दुर्लक्षुन चालणार नाहीत. हे तितकेच खरे.! .    २०१९ मध्ये सुहास कांदे आमदार झाले तेव्हापासून ते आजतगायत सौ. कांदे यांनी महिला संघटन उभे करत महिलांची एक भक्कम फळी उभी केली आहे. महिलांना नुसते पक्षाची पदे देऊन त्यांचा वापर करणारे भरपूर आहेत. मात्र आपल्या माध्यमातून त्यांच्या घर संसाराला हातभार लागावा यासाठी करोडो रुपये खर्च करून गृहउद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या त्या राजकीय घरातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. .    यापूर्वी मतदार संघातील पती नोकरीस असेल तर त्या घरातील महिला सहसा राजकारणात दिसत नाहीत.मात्र सौ....